गुजरात राज्यातून उत्तरप्रदेशातील अट्टल चोरट्याने लंपास केलेली मालमोटार खामगाव पोलिसांनी शनिवारी पकडली. सिनेस्टाईल पाठलाग करून जप्त केलेले हे वाहन गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.उत्तरप्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील हैसी परजी येथील मोहम्मद मुकीम मोहम्मद सगीर याने गुजरातमधील सोनगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हॉटेल ताज परिसरातून १३ ऑक्टोबर २०२२ रोजी जिजे ०५ बिव्ही -४०१३ क्रमांकाच्या ट्रकची बनावट किल्लीचा वापर करून चोरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>साहेब…आता संसाराचा गाडा हाकायचा कसा? ; रानटी हत्तींच्या हैदोसामुळे नागणडोह ग्रामस्थ चिंतेत

याची माहिती सीमावर्ती राज्यांना देण्यात आली होती. दरम्यान, हे वाहन खामगाव परिसरात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यांनी पाठलाग करून जुगनु टी-पॉईंटजवळ वाहन जप्त केले. नंतर आज हे वाहन सोनगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The khamgaon police on saturday caught a cargo truck stolen from the state of gujarat by a thief in uttar pradesh amy