चंद्रपूर: सतत दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आक्सापुर येथील मामा तलाव व रान तलाव असे दोन तलावाची मधोमध असलेली पार फुटल्याने शेकडो हेक्टरवरील धानपिक खरडून गेल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापुर येथे बुधवारला रात्रौ सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने मामा तलाव, रान तलाव या दोन्ही तलावाची पार फुटली. तलावाच्या आजूबाजूच्या शेतशिवारात धान पिकांची राेवणी झाली होती. तलावाची पाळ फुटल्याने रोवणी केलेले धानपिक वाहून गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती कळताच कोठारी पोलीस स्टेशन चे ठाणेदार विकास गायकवाड, सिंचाई विभागाचे अधिकारी प्रियंका रायपूरे, उप विभागीय अधिकारी स्नेहल राहटे, तहसीलदार शुभम बहाकर, राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे यांनी प्रत्यक्ष तलावावर जाऊन पाहणी केली. व तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी व फुटलेली पार दुरुस्त करण्यात यावी यासाठी प्रशासनाला सूचना दिली.