नागपूर: शैक्षणिक उपक्रमांसाठी असलेली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची नागपुरातील ६९८० चौ.मीटर जागा महामेट्रोला निःशुल्क हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेच्या मोबदल्यात महामेट्रो विद्यापीठाला विद्यार्थ्यांसाठी दोन वसतीगृहे बांधून देणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पूर्वी विद्मेयापीठाची जागा मट्रोभवनासाठी घेण्यात आली होती. त्याच भागातील ६९८० चौ.मीटर जागा महामेट्रोने वाहनतळ व अन्य कामासाठी मागितली होती. या जागेवर विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृहे बांधायची असल्याने विद्यापीठाने जागा देण्यास विरोध केला होता.

हेही वाचा… मराठा आरक्षण आंदोलन पेटले असतानाच… परदेशी शिक्षणाची वाट खडतर! सरकारकडून झाली ही चूक

पण शासनाने मध्यस्थी करीत जागेच्या मोबदल्यात विद्मेयापीठाला दोन वसतिगृहे महामेट्रोने बांधून द्यावी,अशी अट घातली व जागा हस्तांतरित करण्याची सूचना विद्यापीठाला दिली. त्यानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याबाबत २७ तारखेला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The land of agricultural university has been transferred to mahametro in exchange for this mahametro will build two hostels for the students in nagpur cwb 76 dvr
Show comments