चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोलारा बफर झोनमध्ये बिबट व अस्वल एकमेकांच्या समोर उभे असल्याचे छायाचित्र समाज माध्यमावर चांगलेच सार्वत्रिक झाले आहे.
९१ वाघ व यापेक्षा अधिक बिबट संख्या असलेल्या तसेच अस्वल संख्याही अधिक आलेल्या ताडोबा प्रकल्पात देशी विदेशी पर्यटकांची गर्दी झाली आहे. उन्हाची तीव्रता बघता पर्यटकांची संख्या रोडावणार असा अंदाज व्यक्त केला जात असताना पर्यटकांनी हा अंदाज खोटा ठरविला आहे. पर्यटक सकाळ व दुपार अशा दोन्ही वेळात सफरीचा आनंद घेत आहेत.
अशातच ताडोबा बफर झोनमध्ये येणाऱ्या कोलारा परिसरात बिबट आणि अस्वल एकमेकांच्या समोर उभे राहून एकमेकांकडे बघत असल्याचे छायाचित्र एका पर्यटकाने टिपले आहे. हे छायाचित्र समाज माध्यमावर सार्वत्रिक झाले आहे.
हेही वाचा – धक्कादायक! ‘रिलायन्य मार्ट’मध्ये जळमटे लागलेल्या अन्नधान्याची विक्री
विशेष म्हणजे या छायाचित्रात बिबट व अस्वल एकमेकांकडे मैत्रीपूर्ण भावनेतून बघत आहेत. दोघांची देहबोली बरीच बोलकी आहे. या छायाचित्रणाची सर्वत्र चर्चा आहे.