राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याला वावण्यासाठी गेलेल्या वनरक्षकवरच बिबट्याने हल्ला केला.मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. ४५ वर ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जंगलालगतचे राष्ट्रीय महामार्ग आणि त्यावरुन जाणारी भरधाव वाहने वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. मंगळवारी सायंकाळी भंडारा जिल्ह्यातील वनविकास महामंडळाच्या लाखनी वनक्षेत्रात मोहघाटा जंगलालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव वाहनाने बिबट्याला धडक दिली. बराचवेळ हा बिबट रस्त्यावर विव्हळत होता. वनखात्याला माहिती मिळाल्यानंतर एका वनरक्षकाने त्याठिकाणी येऊन पाहीले. तो बिबट्याजवळ जाताच बिबट्याने अचानक उसळी घेतली आणि वनरक्षकावर हल्ला करत तो जंगलाच्या दिशेने पळाला.

वनरक्षकावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तर बिबटही जखमी असल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला बेशुद्ध करण्याची परवानगी मुख्य वन्यजीव रक्षकांकडे मागण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच साकोली येथे कारच्या धडकेत एक बिबट मृत्यूमुखी पडला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The leopard attacked the forest guard who went to save the injured leopard amy