भद्रावती येथील आयुध निर्मानी चांदा येथील सेक्टर ५ मध्ये सायंकाळच्या सुमारास फिरायला निघालेल्या एका महिलेवर हल्ला करून जखमी करणारा बिबट गुरुवार २ मार्चच्या पहाटे पावणे ५ वाजताच्या सुमारास पिंजऱ्यात अडकला. सदर बिबट्याला चंद्रपूरच्या सिटीसी केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा- अमरावती : गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; चुलीवर स्‍वयंपाक करून नोंदवला निषेध

२० फेब्रुवारीला सायंकाळी आयुध निर्मानी चांदाच्या वसाहतीतील विमलादेवी टीकाराम या ४२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यासाठी वनविभागाने सेक्टर पाच मध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी पिंजरे लावले होते. आज पहाटे ४:४५ वाजताच्या सुमारास अखेर तो बिबट पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्याला काही ठिकाणी जखमा असल्याने चंद्रपूरच्या सीटीसी केंद्रात उपचारासाठी रवाना केले. उपचारानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे. सदरची कारवाई सहा.वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे,वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी.शेंडे,वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले,क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे,वनरक्षक धनराज गेडाम यांनी केली.

Story img Loader