चंद्रपूर : बिबटं वाघाच्या अधिवास क्षेत्रात आल्याने दोघांत झुंज झाली. यात बिबट्याला जीव गमवावा लागला. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव वनपिरक्षेत्रातील कक्ष क्रमांक २६७ मध्ये घडली. वाघासोबत झालेल्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
वनविभागाच्या पथकाने माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बिबट्याच्या शरीरावर वाघाने ओरबडल्याच्या जखमा आहेत. शवविच्छेदनानंतर बिबट्याला अग्नी देण्यात येणार आहे. यावेळी सहायक उपवनसंरक्षक चोपडे, वनपरिक्षेत्राधिकारी सालकर, क्षेत्रसहायक बुरांडे यांच्यासह वनरक्षक व वनकर्मचारी उपस्थित होते.
First published on: 21-02-2023 at 14:57 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The leopard went into the tiger territory and lost its life rsj 74 ysh