चित्त्यांच्या निवासस्थानावर आता शिकाऱ्यांची नजर गेली असून मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून शिकारीचा पूर्वातिहास असणाऱ्या शिकाऱ्याला बंदूकीसह अटक करण्यात आली आहे. कुनोतून चित्ते बाहेर पडत असतानाच उद्यानाच्या मुख्य भागातून शिकाऱ्याला अटक करण्यात आल्याने चित्त्याची सुरक्षितता धोक्यात तर आली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यानंतर कुनो राष्ट्रीय उद्यान चर्चेत आले आहे. त्यातील एका मादी चित्त्याचा किडनीच्या आजाराने तर नर चित्त्याचा हृदय बंद पडल्याने मृत्यू झाला. त्यानंतर आता आलम मोंगिया नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक बंदूक जप्त करण्यात आली आहे. ही बंदूक त्याने परिसरातील नदीपात्रात पुरून लपवून ठेवली होती. मोंगिया हा राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील रहिवासी आहे. कुनोत चित्ते आणल्यापासून पकडण्यात आलेला तो चौथा शिकारी आहे. त्याचे दोन साथीदार अजूनही फरार आहेत.

हेही वाचा >>>यवतमाळ बाजार समितींच्या निवडणुकीत प्रस्थापितांना दे धक्का; पालकमंत्री संजय राठोड व माजी मंत्री माणिकराव ठाकरे गृह मतदारसंघात ‘फेल’

मोंगियाने यापूर्वीही प्राण्यांची शिकार केली आहे.मोठ्या शिकारी टोळीशी संबंध नसला तरीही कुनो आणि कुनोतील चित्त्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात कडक सुरक्षा व्यवस्था असूनही शिकारींना लगाम लागत नाहीये. नुकतेच याठिकाणी सात महिन्याच्या विशेष प्रशिक्षणानंतर ‘इलू’ नावाचा प्रशिक्षित जर्मन शेफर्ड श्वानदेखील आणण्यात आला आहे.