नागपूर : बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गवर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात होऊन पंचवीसपेक्षा अधिक प्रवासी मृत्युमुखी पडले. मात्र विदर्भ ट्रॅव्हल्सचे स्थानिक बुकिंग कार्यलय सकाळपासून बंद आहे.
हेही वाचा – यवतमाळ: ५० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार; वणीतील घटना, चौघांना अटक
ही बस शुक्रवारी सायंकाळी नागपुरातील गणेशपेठेतील ज्या ऑफिसमधून निघाली होती. या ठिकाणी अनेक प्रवासी चौकशीसाठी येत आहेत. हे कार्यालय बंद असल्यामुळे कुठलीही माहिती लोकांना मिळू शकत नाही. मृतांमध्ये नागपूरच्या सत प्रवाशांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. या अपघातात ट्रॅव्हल्समधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यात नागपूरच्या प्रवाशांचा समावेश आहे.