नागपूर: राष्ट्रीय आदिम कृती समितीची बैठक नुकतीच झाली. याप्रसंगी हलबा जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रासह इतरही विषयावर चर्चा झाली. हे प्रश्न सोडवण्यासाठी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात हलबा जमातीचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय आदिम कृती समितीची बैठक दे. बा. नांदकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात झाली. बैठकीला कृती समितीचे विश्वनाथ आसई, धनजंय धापोडकर, चंद्रभान पराते, ओमप्रकाश पाठराबे, नंदाताई पराते, अभय धकाते, धनराज पखाले, मनोहर घोराडकर आदी उपस्थित होते. लवकरच मोर्चाची तारीखही निश्चित होणार आहे.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
The winter session of Legislature starts December 16 in Nagpur as per Agreement
नागपुरात दरवर्षी विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याबाबत यशवंतराव चव्हाणांचीभूमिका काय होती ?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!

हेही वाचा >>>खरगेंचे खास तरीही काँग्रेस कार्यसमितीतून बाद,नितीन राऊतांबाबत काय घडले ?

हेही वाचा >>>सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वर्धा दौऱ्यात कमालीची गोपनीयता…

बैठकीत विधान भवनावर मोर्चाचे नियोजनासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागात हलबा जमात परिसरात मोहल्ला बैठक, गावोगावी बैठक, निदर्शने, धरणे आंदोलन करण्यावर चर्चा झाली. याप्रसंगी डॉ. देवराम नंदनवार, नागोराव पराते, मुन्ना खडतकर, दिगंबर सदावर्ती, हरी चिचघरे, अनिल नंदनवार, मधुकर सोनकुसरेहेही उपस्थित होते. बैठकीत हलबांच्या न्यायहक्कासाठी सर्व संघटनांनी सक्रिय सहभाग घेऊन कृती समितीने जाहीर केलेला कार्यकम यशस्वी करण्याचे आवाहन केले गेले. प्रास्ताविक धनंजय धापोडकर यांनी तर सूत्रसंचालन धनराज पखाले यांनी केले. तर आभार प्रदर्शन भास्कर चिचघरे यांनी केले.

Story img Loader