नागपूर: महाराष्ट्रासह देशभरात पाऊस सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने येत्या तीन दिवसात काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्याने देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भारतीय हवामान खात्याने “यलो अलर्ट” जारी केला आहे. याशिवाय महाराष्ट्र, गोवा, गुजरात, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा… नागपुरात ‘वैद्यकीय’चे विद्यार्थी आजाराच्या विळख्यात.. प्रकरण काय?
हरियाणामध्ये कमी दाब निर्माण होत आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांचा वेग वाढेल आणि काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने सांगितले आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.