नागपूर : राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन; तीन दिवसांपासून ऊनपावसाचा खेळ सुरू आहे. शनिवार आणि रविवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप सुरु असतानाच जुलै महिन्याची सुरुवात मात्र समाधानकारक पावसानेच होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या चार-पाच दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तर, मराठवाड्यात हलक्या-मध्यम पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्याची सुरुवात समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तरीही मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी उनपावसाचा खेळ सुरू आहे. रत्नागिरीसह कोकणचा दक्षिण पट्टा, सातारा आणि कोल्हापुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रायगडमध्येही पावसाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड आणि पुण्यात येलो अलर्ट असेल. तर, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या भागांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The meteorological department has predicted heavy to very heavy rain at some places in konkan and madhya maharashtra rgc 76 amy
Show comments