नागपूर : मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे मिलिटरी कॅन्टीन अमरावतीहून पुलगावला हलवण्याचा प्रस्ताव होता. परंतु अमरावती येथील हे कॅन्टीन पुलगाव येथे स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाविरोधात माजी सैनिकांनी संपर्क साधला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अमरावती येथे दुसरे माजी सैनिक कॅन्टीन उपलब्ध नाही. त्यामुळे माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची मोठी गैरसोय होणार आहे.
हेही वाचा – नागपूर : ‘गडकरी साहेब… आमचे रस्ते चोरीला जात आहेत..’
हेही वाचा – जे भेसळ करतील त्यांना शिक्षा भोगावीच लागेल, काय म्हणाले मंत्री?
माजी सैनिकांना स्थलांतरित झाल्यानंतर ज्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, ते लक्षात घेऊन, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपक्षेत्राच्या प्रमुखांनी माजी सैनिकांना अखंडित सेवा सुनिश्चित करण्यासाठी, अमरावती येथे कॅन्टीन कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार केंद्रीय कन्टीन अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.