Ayodhya Ram Mandir Opening Ceremony : अयोध्यात राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्‍या निमित्‍त ‘विश्‍वविक्रमी’ शेफ विष्‍णू मनोहर आज (२२ जानेवारी) जगदंबा संस्‍थान कोराडी येथे ६ हजार क‍िलोचा महाप्रसाद तर अयोध्‍येत २६ जानेवारीनंतर ७ हजार क‍िलोचा ‘श्रीराम शिरा’ तयार करून दोन नवे जागत‍िक विक्रम प्रस्‍थापित करणार आहेत. यासाठी जगातील सर्वात मोठी ‘हनुमान’ कढई तयार करण्‍यात आली आहे. विशेष म्हणजे ही कढई विष्‍णू मनोहर अयोध्‍येतील श्रीराम मंदिराला अर्पण करणार आहेत. हलवा बनवायला सुरुवात करण्यात आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी भेट देऊन कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोराडीच्या ऐतिहासिक मंदिरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज राम जन्मस्थानावर रामलल्लांच्या आगमनाच्या निमित्ताने सहा हजार किलो हलवा प्रसाद तयार करण्याचं काम हातात घेतलं आहे. जगातील सर्वांत मोठी कढई तयार करण्यात आली आहे. याला हनुमान कढई म्हणतात. सहा हजार किलोच्या हलव्यासाठी सात हजार किलोचं साहित्य लागलं आहे. त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडणारा हलवा तयार होणार आहे. इथे हलवा तयार झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात विष्णू मनोहर अयोध्येला जाणार आहेत. पुढच्या आठवड्यात अयोध्येत ते नवा रेकॉर्ड करण्यात येणार आहे. राम भक्तांचा हा उत्साह महत्त्वाचा आहे. देशभरात हा उत्साह पाहायला मिळतोय. आम्ही वाट पाहतोय की कधी रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल.तसंच, मीही हा हलवा खायला मागवणार आहे.

Ladki Bahin Yojana Next Installment Date
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभची पुराणकथा, इतिहास आणि ज्योतिषशास्त्र काय सांगते?
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
Passenger bitten security force jawan, Vasai,
वसई : प्रवाशाने घेतला सुरक्षा बलाच्या जवानाचा चावा
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…

हेही वाचा >> राम मंदिराच्या बांधकामात स्टील आणि लोखंडाचा वापर नाही, जगभरातील पहिलाच प्रयोग? जाणून घ्या सविस्तर

राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा बहुप्रतिक्षित होता. या सोहळ्याकरता अवघ्या देशाचं लक्ष लागून होतं. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्याकरता हा अतिशय भावनिक दिवस आहे. कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला, ज्या क्षणाकरता विसाव्या वर्षी तुरुंगात गेलो, गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं, असा क्षण याची देहि याचा डोळा बघायला मिळणं हा रामाचा आशीर्वादच आहे.

“आमचा नारा होता रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाएंगे. ६ डिसेंबर १९९२ बाबरीचा ढाचा खाली आला. आणि मंदिर तिथेच तयार झालं. त्यानंतर आमचा नारा होता रामलल्ला हम आयेंगे, मंदिर भव्य बनाऐंगे. आता हे मंदिर तयार झालं असून प्राणप्रतिष्ठा होत आहे. केवळ कारसेवक नाही, तर कोट्यवधी हिंदूंकरता हा ऐतिहासिक दिवस आहे. आजपासून भारताची नवीन अस्मिता सुरू होत आहे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हनुमान कढईत होणार विश्वविक्रम

ही हनुमान कढई १५ हजार लिटर क्षमतेची असून १८०० क‍िलो वजन व १५ फूट व्‍यासाची आहे. ही कढई तयार करण्‍यासाठी ६ मी.मी. जाडीचा स्‍टीलचा पत्रा वापरला गेला असून हा पत्रा धरणाची दारे किंवा जहाज बांधणीसाठी उपयोगात आणला जातो. कढईचा तळभाग लोखंड व तांबे या धातूंपासून तयार करण्‍यात आला आहे. तो १० फूट आकाराचा आहे. दोन धातूंचे पत्रे एकावर एक तळाशी लावल्‍यामुळे ते उष्‍णता शोषून घेतील आणि शिरा जळणार नाही. या कढईत वापरला जाणारा एक सराटा हा २४ इंच रुंदीचा असून ३२ क‍िलो वजनाचा आहे. ही कढई विश्‍वकर्मा फॅब्रिकेशन वर्क्‍स, एमआयडीसी, नागपूर येथे नागेंद्र विश्‍वकर्मा व त्‍यांचे वडील अनिरूद्ध विश्‍वकर्मा यांच्‍या देखरेखीखाली तयार करण्‍यात आली आहे. ही कढई घडवायला १५ ते २० कारागीराची मदत घेण्‍यात आली. हे आव्‍हानात्‍मक कार्य करायला जवळपास एक महिन्‍याचा कालावधी लागतो. परंतु, विश्‍वकर्मा पिता-पुत्र आणि कारागीर यांची कौशल्‍यबुद्धी, मेहनत, रामभक्‍ती यांच्‍या जोरावर हे कार्य एक आठवड्यातच पूर्ण झाले आहे.

Story img Loader