नागपूर: उत्तर नागपुरातील उप्पलवाडी- नारी एस.आर.ए. पुनर्वसन वसाहतीला शहराशी जोडणारा रस्ता व मूलभूत नागरी सोयी -सुविधांच्यापूर्तते साठी शहर विकास मंच, उत्तर नागपूर विकास आघाडी व एस.आर.ए. संकुल विकास समितीच्या नेतृत्त्वात संतप्त रहिवाश्यांनी शुक्रवारी महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढल्यांतर प्रशासन खडबडून जागे झाले असून तातडीने पर्यायी रस्त्याचे काम सुरू केलेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत उत्तर नागपुरातील नारी- उप्पलवाडी भागात शहरापासून दूर आडवळणाच्या जागेवर ५४४ गाळ्यांचे पुनर्वसन वसाहत संकुल बांधले आहे. शहरातील विविध प्रकल्पांमुळे बाधित झोपडपट्टीवासियांचे येथे पुनर्वसन करण्यात आलेले असून सध्या येथे हजारावर नागरिक वास्तव्यास आहेत. परंतु, या वसाहतीला शहराशी जोडणारा रस्ताच नव्हता. स्थानिक नागरिकांनी यासाठी पाठपुरावा केला. या प्रश्नाची तड लावण्यासाठी रहिवाश्यांनी महापालिकेच्या मुख्यालयावर शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी मोर्चा नेला.

हेही वाचा >>> Samruddhi Highway: ‘समृद्धी’वर जबरी चोरी टोळी जेरबंद, इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

याची दखल घेत महापालिकेने दुसऱ्याच दिवशी एस.आर.ए.कालनी – माधव नगर -उप्पलवाडी पेट्रालपंप या दोन कि.मी.च्या पर्यायी रस्त्याचे काम सुरू केले आहे. पुनर्वसन वसाहतीला जोडणारा मुख्य रस्ता व सर्व मूलभूत सोयी उपलब्ध होत नाहीत, तो पर्यंत नागरिकांचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक यांनी दिला आहे.