अकोला: ‘बाईपण भारी देवा’ मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतांनाही अकोल्यातील मिराज सिनेमा चित्रपटगृहाने मुख्य बोर्डावर चित्रपटाचे फलक न लावल्याने मराठी रसिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चित्रटपगृहावर सोमवारी धडक देत व्यवस्थापकांना समज दिली. त्यानंतर अखेर ‘बाईपण भारी देवा’चे फलक काही तासांमध्ये चित्रटपगृहाच्या मुख्य बोर्डावर झळकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातच ‘मल्टीप्लेक्स’ चित्रपटगृहांकडून मराठी चित्रपटांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा अनुभव वारंवार येतो. अकोल्यात त्याचाच प्रत्यय ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या बाबतीत आला. हा मराठी चित्रपट स्थानिक मिराज चित्रपटगृहात सुरू आहे. रसिकांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे फलक मुख्य बोर्डावर लावण्यात आलेले नव्हते. त्यावर रसिकांनी नाराजी व्यक्त केली. त्या संदर्भात महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मिरज सिनेमा येथे धडकले.

हेही वाचा…. ‘बाईपण भारी देवा’साठी धावून आली मनसे, चित्रपटगृहावरील फलकावरून…

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे मोठे फलक मुख्य बोर्डावर न लावल्यास इतर चित्रपट सुरू राहू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर आता ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे फलक मुख्य बोर्डावर झळकले आहे. त्यामुळे मराठी रसिकांनी आनंद व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The movie poster of baipan bhari deva has been displayed on the main board of the miraj cinema within a few hours of mns warning in akola ppd 88 dvr