नागपूर : शहरातील दोन युवा व्यापारी निरालाकुमार सिंह आणि अंबरीश गोळे यांच्या हत्याकांडाचा उलगडा निराला यांच्या पत्नीमुळे झाला. तासाभरात घरी परतणारा पती दोन तास झाले तरी घरी पोहोचला नाही. त्यामुळे पत्नीने वारंवार फोन करून त्यांना लोकेशन विचारले. त्यांनी चिटणवीस सेंटर येथील रेस्ट्रॉरेंटमध्ये ओंकार तलमले आणि विजय पूंज यांच्यासोबत बसल्याचे सांगितले. पतीचे अपहरण झाल्यानंतर निराला यांच्या पत्नीने ओंकार आणि विशाल पूंज यांचे नाव सांगितले. त्यामुळे तीन तासांत हत्याकांडाची घटना उघडकीस आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निरालाकुमार सिंह याचा मित्र ओंकार तलमले याने कारखान्यातील काळा पैसा पांढरा करण्यासाठी दीड कोटी रुपये बँक खात्यात टाकल्यास २.८० कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले. मात्र, ओंकारला पैसे न देता केवळ दीड कोटी रुपये हडपायचे होते. त्यामुळे त्याने बजरंग दलाचा पदाधिकारी विशाल पूंज याला कटात सहभागी केले. ५० लाखांत निराला यांची सुपारी दिली. तत्पूर्वी दोघांनीही कटाच्या नियोजनानुसार निराला यांना सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेस्ट्रॉरेंटमध्ये नेले. दरम्यान, निराला यांच्या पत्नीचा फोन आला. त्यांनी विशाल आणि ओंकार यांची नावे सांगितली. त्यानंतर तासाभरातच निराला बेपत्ता झाले. पतीचा मोबाईल बंद येत असल्याने पत्नीने सीताबर्डीत तक्रार दिली. ओंकार आणि विशाल यांच्या मोबाईलचे लोकेशन घेतले असता निराला यांचे अपहरण केल्याची बाब समोर आली. तीन तासांत दोघांनाही ताब्यात घेतल्याने हत्याकांडाचा उलगडा झाला.

हेही वाचा – सोन्याच्या दरात घसरण… नागपुरातील आजचे दर पहा..

हेही वाचा – हिंगोली : भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडल्या; प्रकृती गंभीर

दोन पिस्तूल जप्त

शहरातील युवा व्यापारी अंबरीश गोळे आणि निरालाकुमार सिंह यांचा खून करण्यासाठी ओंकार तलमले याने वापरलेल्या दोन पिस्तूल ग्रामीण पोलिसांनी जप्त केले. ओंकारने दत्तवाडी, स्मृती लेआउट, वाडी येथील घराच्या छतावर दोन्ही पिस्तूल लपवून ठेवले होते. गिट्टीखदानमधील अब्दुल मन्नान याच्याकडून चारही पिस्तूल विकत घेतल्याची कबुली ओंकार तलमले आणि बजरंग दलाचा पदाधिकारी विशाल पूंज यांनी दिली. निरालाकुमार सिंह यांचा मृतदेह अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे आरोपींच्या समक्ष मृतदेह फेकण्याच्या ठिकाणाची पडताळणी करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The murder case of two traders in nagpur city was solved adk 83 ssb