बुलढाणा: आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा स्तुत्य निर्णय देऊळगाव राजा येथील मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. येत्या २९ जूनला आषाढी एकादशी आहे. त्याच दिवशी मुस्लीम बांधवांची बकरी ईदसुद्धा साजरी होणार आहे. हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहे. एकादशीला हिंसा नको, हिंदू मुस्लिम बांधवातील सामाजिक एकोपा टिकून राहावा यासाठी पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी मुस्लीम बांधवांना या दिवशी कुर्बानी न देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत देऊळगाव राजा येथील मशीद कमिटीने ठराव घेतला. गुरुवारी देऊळगाव राजा शहरात मुस्लीम बांधव कुर्बानी देणार नाही, असे पत्र देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देऊळगाव राजाच्या मुस्लीम बांधवांच्या या निर्णयाचे सुनील कडासने यांनी स्वागत केले आहे. तसेच जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांनीदेखील याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा… “ओवेसींनी मर्यादेत राहून बोलावे, अन्यथा…” नवनीत राणांचा इशारा

सामाजिक एकोप्यासाठी निर्णय

या पत्रात देऊळगाव राजा नगरीत सर्व जातीधर्माचे नागरिक सामाजिक एकोपा राखून गुण्यागोविंदाने राहतात, असे नमूद आहे. आजवरच्या दीर्घ काळात येथे धार्मिक वाद झाला नाही. यामुळे हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर राखून आषाढीला बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. समिती अध्यक्ष अब्दुल रशीद शेख महेबूब भंडारी व सचिव हाजी समशेर खान महेबूब खान यांनी हे पत्र दिले आहे.