नागपूर शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून गळ्यात पट्टे घालण्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेला स्पष्टीकरण मागितले आहे. याप्रकरणी येत्या ४ जानेवारीला सुनावणी होणार आहे.
हेही वाचा- चंद्रपूर: शिवारात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला, ८०० मीटरपर्यंत फरपटत नेले आणि…
मोकाट कुत्र्यांना न्यायालय परिसरात अन्न खाऊ घालता यावे, याकरिता एक निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती करणारे पत्र महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी उच्च न्यायालय निबंधकाला पाठवले होते. त्यामुळे मागील सुनावणीत उच्च न्यायालयाने हा अवमाननेचा प्रकार असल्याचे निरीक्षण नोंदवत ॲड. अंकिता शहा आणि डॉ. महल्ले यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ‘तुमच्यावर अवमानना कारवाई का करण्यात येऊ नये?,’ अशी विचारणा न्या. सुनील शुक्रे व न्या. महेंद्र चांदवानी यांनी केली होती.
हेही वाचा- न्यायालयाची नागपूर विद्यापीठ प्रशासनाला चपराक; १७ डिसेंबरच्या पदवीधर निवडणुकीला स्थगिती
बुधवारी याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी शहा यांच्यावतीने उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांना पुढील तारखेपर्यंत लेखी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे डॉ. महल्ले यांनीही उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली असून त्यांच्या माफीचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयाने स्वीकारले आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा सुरू असलेला हैदोस थांबवण्याचे आदेश देण्यात यावे या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेचे आता जनहित याचिकेत रूपांतर झाले आहे. ॲड. शहा यांच्यातर्फे ॲड. श्रीरंग भांडारकर, मध्यस्थीतर्फे ॲड. रवि सन्याल, याचिकाकर्त्यातर्फे ॲड. फिरदोस मिर्झा, धंतोली नागरी मंडळातर्फे ॲड. अश्विन देशपांडे , महापालिकेतर्फे ॲड. सुधीर पुराणिक, सरकारतर्फे ॲड. दीपक ठाकरे