गडचिरोली: २२ डिसेंबर रोजी नक्षलवाद्यांनी भारत बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री नक्षल्यांनी दक्षिण गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात झाड तोडून रस्त्यावर टाकले तर पोस्टर लावून जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह झाला. यात तीन निष्पाप नागरिकांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. २१ डिसेंबर रोजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना तोडगट्टा आंदोलनावरून इशारा देणारे पत्रक जारी करणाऱ्या नक्षल्यांचा दक्षिण गडचिरोलीमध्ये धुडगूस सुरूच आहे. गुरुवारी रात्री नक्षल्यांनी भामरागड – आलापल्ली रस्त्यावरील बेजूर फाट्यालगत झाड तोडून रस्त्यावर टाकले तर भामरागड- लाहेरी रोडवर पोस्टर लावल्याचा प्रकार समोर आला.

हेही वाचा… ‘मेयो’त सतत रुग्णवाढ, औषधांच्या खर्चाला मात्र कात्री! तीन वर्षातील धक्कादायक स्थिती उघड

झाड रस्त्यावर टाकल्याने भामरागड- आलापल्ली रस्ता काही वेळ बंद होता. पोलिसांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान, दक्षिण गडचिरोलीमध्ये नक्षली पुन्हा सक्रिय झाल्याने दहशत निर्माण झाली आहे. भारत बंदच्या आवाहनानंतर पोलीस सतर्क झाले होते. नक्षल्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांनी देखील व्यूहरचना आखली असून नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The naxalites blocked the bhamragad alapalli road by cutting a tree put up posters urging people to participate in the mass movement gadchiroli ssp 89 dvr