महाभारत काळात पांडवांनी अज्ञातवासात जाण्याआधी त्यांची शस्त्रास्त्रे श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन आपट्याच्या झाडावर लपवून ठेवली. अज्ञातवास पूर्ण झाल्यानंतर ती बाहेर काढली तेव्हा ती सोन्यासारखी उजळून निघाली. तेव्हापासून दसऱ्याला सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटण्याची प्रथा सुरू आहे. मात्र, प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली अवघा वृक्ष ओरबडला जात असल्याने तो आता दुर्मिळ श्रेणीकडे वाटचाल करत आहे.
हेही वाचा- शहरातील रस्त्यांवर बांधकाम साहित्याचे ढिगारे; अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा
अनेक औषधी गुणधर्म असलेल्या या प्रजातीच्या वृक्षाची अशाश्वत पद्धतीने तोड होत असल्याने त्याच्या संवर्धनाची गरज वृक्षप्रेमी करत आहेत. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून देण्याची प्रथा आहे. जंगलामधून आपट्याच्या झाडांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. आपट्याच्या झाडांची पाने लहान फांद्याांसह पूर्णपणे ओरबडल्याने फुले व फळे येत नाहीत. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने होणारी या झाडाची उत्पत्ती पूर्णपणे थांबली आहे. नैसर्गिकरित्या त्याचे बियाणे तयार होत नाही कारण त्यासाठी आवश्यक वातावरण नाही. त्यामुळे या प्रजातीचे प्रमाण कमीकमी होत आहे. ही पाने विकण्यासाठी विक्रेता केवळ पानेच तोडून आणत नाही तर त्याच्या फांद्या तोडतात. काही ठिकाणी अवघे झाड तोडले जाते. वृक्षप्रेमींनी याचा तीव्र निषेध केला आहे.
हेही वाचा- वाशिम : शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून ५० ‘एसटी बसेस’ जाणार , प्रवाशांना मात्र मन:स्ताप
” आपट्याला शास्त्रीय भाषेत ‘बहूनिया रेसमोसा’ असे म्हणतात. हा एक आदर्श वृक्ष असून औषधीयुत आहे. याची पाने, फुले, फळे, बिया मूतखडा, पित्त, कफ, दाह इत्यादीवर गुणकारी आहे. जैव विविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला आपटा सोने म्हणून वापरुन शेवटी कचरा म्हणून फेकून दिला जातो. या पद्धतीने एका वृक्षाची प्रजातीच आपण संपवत आहोत हे एकविसाव्या शतकातील आधूनिक समजणाऱ्या माणसाला कधी कळणार? स्वच्छ ऑक्सीजन, औषधी देणाऱ्या आपट्याची प्रजातीच आपण संपवणार का? शेवटी आपल्याला श्वास देवून जीवन देणारी झाडे वाचवायची की नाही हे स्वतःपासून ठरवायचे आहे. ”
-प्र.स. हिरुरकर, निसर्गप्रेमी