नागपूर: संपत्तीच्या हिस्सेवाटणीवरून झालेल्या वादात पुतण्याने काकूच्या पोटात चाकू भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सांयकाळी घडली. सदर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली तर दोघांचा शोध सुरु आहे. निलिमा ऊर्फ कल्पना वाघ (४०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. सुमित वाघ आणि मुकुल खडसे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू पांडूरंग वाघ यांचे सदरमध्ये जाल कंपाऊंड, माऊंट रोड येथे वडिलोपार्जित घर आहे. त्यांचा पुतण्या सुमित वाघ याला घरात हिस्सा हवा होता. मात्र, राजू त्याला हिस्सा देण्यास तयार नव्हते. सुमितने एमआयडीसी परिसरातील त्याच्या हिस्स्यावर आलेले घर विकले होते. त्यामुळे या घरातील हिस्सा नाकारण्यात आला होता.

हेही वाचा… ‘भानूसखिंडी’ने टाकली ‘सचिन’ला गुगली; ‘ती’च्या दर्शनाविनाच ‘मास्टरब्लास्टर’ परतला…

त्याचा राग आल्याने सुमितने शुक्रवारी सायंकाळी मुकुल खडसे आणि अन्य दोन मित्रांसह राजू वाघ यांचे घर गाठले व वाद घातला. त्याची समजूत घालण्यासाठी पत्नी कल्पना समोर आल्या. आरोपींनी कल्पना यांच्या पोटात चाकू भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला व पळून गेले. आज शनिवारी सकाळी सुमित आणि मुकुल या दोघांना सदर पोलिसांनी अटक केली. तर दोघे अद्याप फरार आहेत.