अमरावती: वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषदेसाठी (सीएसआयआर) विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) द्वारे आयोजित करण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) यंदा २६ ते २८ डिसेंबर अशी तीन दिवस देशभर पार पडणार आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची व शुल्क जमा करण्याची मुदत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्जांच्या दुरुस्तीसाठीही युजीसीने २ ते ४ डिसेंबरदरम्यान एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. दरम्यान डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेचा निकाल पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये घोषित केला जाणार असल्याची नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने जाहीर केलेल्या वेळापत्रकात नमूद आहे. परीक्षा सीबीटी पद्धतीने म्‍हणजे संगणक आधारित असेल. अर्ज भरण्यासह अधिक माहितीसाठी csirnet.nta.ac.in या संकेतस्थळावर भेट देता येईल.

हेही वाचा… अमरावती: ‘एमडी’ अमली पदार्थ विक्री प्रकरणी एकाला अटक

एमसीक्यू पध्दतीचे प्रश्न, ३ तासांची परीक्षा सीएआयआर नेट परीक्षा ही १८० मिनिटे म्हणजे ३ तासांची असणार आहे. त्यात एमसीक्यू म्हणजे ऑब्जेक्टीव्ह स्वरुपात बहुपर्यायी प्रश्न म्हणजे संगणक आधारित असेल. असतील, विशेष म्हणजे परीक्षेत अधिक निगेटीव्ह माकींग नसेल. तसेच परीक्षा ही हिंदी आणि इंग्रजी स्वरुपात होईल.

प्रवर्गनिहाय शुल्क असे….

परीक्षेचे शुल्क हे प्रवर्गनिहाय भिन्न आहे. सर्वसाधारण गटासाठी ११०० रुपये आकारले जातील. तर इडब्ल्यूएस, ओबीसींसाठी ते निम्मे म्हणजे ५५० रुपये आणि एससी, एसटी आणि तृतीय पंथीयांसाठी मात्र २७५ रुपये शुल्क आकारले जाईल. दिव्यांग अर्थात पीडब्ल्यूडी उमेदवारांना कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यासाठी जातीचे आणि जातप्रमाणपत्र तसेच दिव्यांगांना आपले दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The net exam will be held across india for three days from 26 to 28 december the students have till 30th november to apply and pay the fee mma 73 dvr