अमरावती: संपूर्ण महिला कर्मचारी संचलित असलेल्या नवीन अमरावती रेल्वे स्थानकाला ‘पिंक स्‍टेशन’ म्‍हणून घोषित करण्‍यात आले आहे. नवीन अमरावती रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्‍या भुसावळ विभागातील पहिले ‘महिला राज’ स्थानक आहे. या रेल्वे स्थानकात स्थानक प्रबंधक, तिकिट तपासनीस, सफाई कर्मचारी या पदावर महिला कर्मचारी आहेत. तर, हे रेल्‍वे स्थानक इतर रेल्वे स्थानकापेक्षा हटके दिसण्यासाठी गुलाबी रंगाने रंगविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासह काही विद्युत दिवे देखील गुलाबी रंगाचे आहेत. त्यामुळे नवीन अमरावती स्थानकाची वेगळी ओळख तयार झाली आहे. नवीन अमरावती रेल्‍वे स्‍थानकावर दैनंदिन कामकाज ४ महिला स्‍टेशन मास्‍टर, ४ महिला पॉइंट वुमन, दोन महिला आरपीएफ कर्मचारी यांच्‍यासह सर्व महिला रेल्‍वे कर्मचारी हाताळतात. महिला सक्षमीकरणाचे हे एक उदाहरण ठरले आहे.

हेही वाचा… ‘हिंदी अल्पसंख्यांक’ कोट्यावरून अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत सुरू आहे गोंधळ…

नवीन अमरावती रेल्‍वे स्‍थानकावर लागणा-या सर्व आवश्‍यक सोयीसुविधा, रेल्‍वे गाड्यांचे आरक्षण, रेल्‍वे सुरक्षा बल, रेल्‍वे पोलीस, संगणक कक्ष, पार्सल सुविधा, स्‍थानक प्रबंधन, तिकीट निरीक्षक, सफाई कर्मचारी, वाहतूक व्‍यवस्‍था सर्वकाही महिला अधिकारी आणि कर्मचारी सांभाळत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The new amravati railway station with an all women staff becomes first pink station in bhusawal division mma 73 dvr
Show comments