वाशिम: प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेल्या नागठाणा (पाच मैल) ते जुमडा या रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर सध्या पुलाचे काम सुरु आहे. परंतु नवा कोरा पूल रात्रीतून वाकला. सुदैवाने कोसळला नाही. मात्र कंत्राटदाराने रात्रीतून वाकलेल्या पुलाला चक्क स्टेपण्या लावून आधार दिला खरा मात्र हा पूल किती दिवस तग धरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत वाशिम तालुयातील नागाठाणा ( पाच मैल) ते जुमडा या ९.१९ किमी मार्गाचे काम जिल्हा सिमेपर्यंत दर्जोन्नत डांबरीकरण व काँक्रिटीकरण अंतर्गत सुरू आहे. मात्र, या रस्त्याचे व पुलाचे काम अंदाजपत्रकाला बगल देऊन होत आहे. अश्या अनेक तक्रारी झाल्या.परंतु अनेकवेळा प्रधानमंत्री ग्राम सडक विभागा कडून कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदार मदन सावके यांनी केला आहे.

Elphinstone Road Over Bridge
Elphinstone Bridge: मुंबईतील १२५ वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल पाडला जाणार; वाहतूक कोंडीमुळे हाल होणार?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ganga River Varanasi
Varanasi News : गंगा नदीवर दोन बोटींची टक्कर झाल्याने एक बोट बुडाली, एनडीआरएफच्या तत्परतेमुळे १८ प्रवासी सुखरुप!
dilapidated, bridge, Mumbai, traffic ,
मुंबईतील आणखी एक पूल जीर्ण, पुनर्बांधणीसाठी वाहतूक बंद
reconstruction of Bridge located between Mahim and Bandra stations successfully completed
माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण
new pamban bridge
समुद्रात उभारलेला पंबनचा जुना पूल वर्षांनुवर्ष टिकला; नवीन पुलाचं आयुष्य ५८ वर्षच का?
Cracks appear in Butibori overbridge, closed for traffic
निकृष्ट बांधकामामुळे पूल खचला, गडकरींवर नामुष्कीची वेळ!, ‘एनएचआय’ने हात झटकले, आमदाराचे मौन
butterfly bridge over pawana river remains incomplete even after deadline expired
‘बटरफ्लाय’ पुलाचे ‘उड्डाण’ केव्हा? आतापर्यंत ४० कोटींचा खर्च; सात वर्षांनंतरही काम अपूर्ण

हेही वाचा… चक्क महिलांनीच केला महिला शिपयाचा विनयभंग; काय आहे प्रकरण जाणून घ्या…

त्यातच खंडाळा गावाजवळ पुलाचे काम सुरु होते. मात्र पूल अचानक वाकला. त्यावेळी कंत्राटदाराने चक्क गाडीच्या स्टेपण्या लावून आधार दिला. यामुळे पूल तग धरून आहे. परंतु ग्रामस्थानी रोष व्यक्त करून काम बंद ठेवा व दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सद्या चालू असलेल्या रस्ता व पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार संबंधित विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेकदा केली. मात्र कुठलीच कारवाई होत नाही त्यातच पूल वाकला. मात्र अधिकारी संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत. आता न्याय न दिल्यास ग्रामस्थसह उपोषण करू. – मदन सावके, तक्रारदार, रा. खंडाळा खु. ता. जि. वाशिम.

पुलाच्या कामासाठी स्टेपण्या ( जॅक ) लावले जातात. त्यामुळे त्यांचा उपयोग होते. काम रीतसर होत आहे, असे कनिष्ठ अभियंता (प्र. ग्रा. यो.) मोकळे यांनी सांगितले.

Story img Loader