महेश बोकडे

नागपूर: राज्यात गेल्या तेरा दिवसांत करोनाचे संक्रमण वाढल्याने सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रमाच्या अहवालानुसार, राज्यात २८ मार्चला २ हजार ३४३ सक्रिय करोनाग्रस्त होते. ही संख्या ९ एप्रिल २०२३ रोजी वाढून ४ हजार ५८७ वर पोहचली.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Mom delivers baby by herself while riding in the car to the hospital Shocking video
चमत्कारावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

राज्यात मध्यंतरी करोना नियंत्रणात आला होता. परंतु, आता मुंबई (१,४३४ रुग्ण), ठाणे (८२० रुग्ण), पुणे (७४७ रुग्ण), नागपूर (३२८ रुग्ण), रायगड (२५१ रुग्ण) येथे करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. इतरही भागात कमी-अधिक रुग्णवाढ सुरू आहे. राज्यातील ९ एप्रिलची सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या ४ हजार ५८७ रुग्णांवर पोहचली आहे.

रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, परभणी येथे २८ मार्चच्या तुलनेत ९ एप्रिललाही सारख्याच संख्येत रुग्ण आढळले. कोल्हापूर, अहमदनगर, जालना, भंडारा येथे मात्र २८ मार्चच्या तुलनेत ९ एप्रिलला सक्रिय रुग्णसंख्या कमी झालेली दिसत आहे. या वृत्ताला आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांची स्थिती

जिल्हा २८ मार्च २०२३ ९ एप्रिल २०२३

कोल्हापूर ३८ रुग्ण ३१ रुग्ण

अहमदनगर ४७ रुग्ण ३३ रुग्ण

जालना ०४ रुग्ण ०३ रुग्ण

भंडारा ०५ रुग्ण ०० रुग्ण

रत्नागिरी २२ रुग्ण २२ रुग्ण

नंदूरबार ०४ रुग्ण ०४ रुग्ण

धुळे ०६ रुग्ण ०६ रुग्ण

परभणी ०० रुग्ण ०० रुग्ण