नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या (वर्ष २०२२) तुलनेत २०२३ मध्ये (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट) या आठ महिन्यांत डेंग्यूचे दुप्पट रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबरनंतरही सातत्याने रुग्ण आढळत असल्याने ही रुग्णसंख्या तिपटीहून अधिक होण्याची भीती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये २०२२ या वर्षभरात डेंग्यूचे ५५२ रुग्ण आढळले होते. परंतु एकही मृत्यू नव्हता. नवीन वर्षात १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२३ या आठ महिन्यांत तब्बल १ हजार १६७ रुग्ण आढळले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले.

हेही वाचा – भरती प्रक्रियेतून शासनाला सुमारे २६५ कोटींचा महसूल; सामान्य विद्यार्थ्यांच्या लुटीचा आरोप

पूर्व विदर्भात आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. नागपूर जिल्ह्यात आताही मोठ्या संख्येने डेंग्यूग्रस्त आढळत आहेत. या भागात एवढे रुग्ण आढळल्याच्या वृत्ताला नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दुजोरा दिला आहे.

हेही वाचा – वर्धा : अखेर ‘गुठली’ स्थानबद्ध, नागपूरच्या कारागृहात रवानगी

चिकनगुनिया, हिवतापाचाही फटका

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये २०२१ मध्ये चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. परंतु २०२२ मध्ये ६ आणि २०२३ मध्ये ऑगस्टपर्यंत १२ रुग्णांची नोंद झाली आहे. हिवतापाचे या भागात २०२१ मध्ये १० हजार ९८५ रुग्ण आढळले होते. ही संख्या २०२२ मध्ये घसरून ७ हजार ८४६ रुग्णांवर आली होती. परंतु २०२३ मध्ये ऑगस्टपर्यंत येथे ३ हजार ९१२ रुग्ण आढळले. ही संख्या चार महिन्यांत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The number of dengue patients has doubled in east vidarbha how many patients in which district mnb 82 ssb
Show comments