वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आणि वाहनचालकांचा सुसाट वाहन चालवण्याची वृत्ती यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडलेली आहे. वाहनचालकांवर पोलिसांचा वचक उरला नसल्याने नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सर्वाधिक युवा वर्गांचा समावेश आहे. महिला व तरुणीही यात मागे नाही.

हेही वाचा- नागपूरकर ग्रंथरसिकांना पर्वणी; काय असणार ग्रंथोत्सवात

Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

शहरात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. पोलीस वाहतूक व्यवस्था नियंत्रणाचे काम सोडून फक्त चौकाचौकात सावज शोधण्यासाठी उभे असतात. युवा वर्गात नियम तोडण्याचे प्रमाण वाढत आहे. सिग्नल तोडून वेगाने वाहन चालवणाऱ्यांना अपघाताचीही भीती उरली नाही किंवा त्यांच्या चुकीने इतर कुणी जखमी होईल याचीही तमा नाही. दिवसेंदिवस ही वृती वाढत आहे. गेल्यावर्षी नागपुरात १७८ तर यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत १८६ प्राणांतिक अपघात झाले आहेत. अपघातांमध्ये मृत पावणाऱ्यांमध्ये युवा वर्गांची संख्या सर्वाधिक आहे.

देशात ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. हे टाळण्यासाठी व बेशिस्त वाहनचालकांना चाप बसावा, या उद्देशाने मोटार वाहन कायदे कडक करण्यात आले आहेत. रस्त्यावर तडजोड शुल्क भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दंड भरणार पण वाहतूक नियम तोडणार, अशा भूमिकेमुळे पोलिसांचे फावत आहे. मात्र, सध्या शहरातील वाहतूक पोलिसांचा वचक संपल्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- शिकवणी वर्गात जाणारा तुमचा मुलगा सुरक्षित आहे का?

पोलिसांचा वचक का संपला?

वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई ऐवजी थेट वसुली करतात. दंडाची रक्कम अव्वाच्या सव्वा सांगून थेट पावती न फाडता पैसे घेतात, अशा तक्रारी आहे. शहरातील व्हेरायटी चौक, शंकरनगर चौक, अंबाझरी तलाव रोड, माटे चौक, वर्धा रोड, सोनेगाव चौक, नरेंद्रनगर, आयटी पार्क चौक, हिंगणा रोड, एमआयडीसी चौक, वाडी रोड, राजीवनगर, जुनी कामठी, विमानतळ चौकात वाहतूक पोलीस रस्त्यावर कोपऱ्यात उभे राहून सावज शोधत असल्याचे चित्र नित्याचे आहे.

अधिवेशनाच्या तोंडावर वाहतूक विस्कळीत

नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शहरात वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर असतो. वाहतूक नियंत्रणाची मोठी जबाबदारी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येते. मात्र, सध्या शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडलेली आहे.

हेही वाचा- नागपूर : कुलगुरूंची नामुष्की, अवैध ठरवलेले अर्ज न्यायालयाकडून वैध

हेल्मेट न वापरणारे साडेचार लाखांवर

दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती असूनही हेल्मेट न वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २०२१ मध्ये २ लाख ९५ हजार हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तर यावर्षी हा आकडा दुपटीने वाढला आहे. यावर्षी १० महिन्यांतच ४ लाख ७२ लाख दुचाकीस्वारांवर हेल्मेटची कारवाई करण्यात आली आहे.

“वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सर्वोत्तम राहू शकते. प्रत्येक चौकात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यांना ई-चालान पाठवण्यात येत आहे,अशी माहिती वाहतूक विभागांचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त अमित डोळस यांनी दिली