नागपूर : धामणाजवळील चामुंडी कंपनीत झालेल्या स्फोटातील आणखी एका जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रद्धा पाटील (२२,धामणा) असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. या स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रमोद चव्हारे नावाच्या कामगारावर अद्यापही उपचार सुरु असून त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर शुक्रवारी जानसा म्हरसकोल्हे या कामागाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

धामणा गावाजवळील चामुंडी एक्स्पोलसिव्ह कंपनीत गुरुवारी सकाळी स्फोटकांला आग लागल्याने मृत्यू झाला होता. या स्फोटात ९ कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी सहा कामगार प्रांजली मोदरे (२२, धामणा), प्राची फलके (२०), वैशाली क्षीरसागर (२०), शीतल चटप (३०) मोनाली अलोने (२७) आणि पन्नालाल बंदेवार (५०, सातनवरी) यांचा घटनेच्या दिवशीच मृत्यू झाला होता. तर तर श्रद्धा पाटील, प्रमोद चव्हारे आणि दानसा म्हरसकोल्हे या तिघांवर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. शुक्रवारी सायंकाळी जानसा म्हरसकोल्हे याचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर श्रद्धा पाटील आणि प्रमोद चव्हारे याच्यावर दंदे रुग्णालयात उपचार सुरु होता. उपचारादरम्यान शनिवारी दुपारी श्रद्धा पाटील हिचा मृत्यू झाला तर प्रमोद चव्हारेवर उपचार सुरु आहेत. 

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?

हेही वाचा >>>विस्तव कायम! खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सत्कार सोहळ्यांपासून विजय वडेट्टीवार दूरच; काँग्रेसमध्ये…

नागपूर जवळील धामना येथे स्फोटके तयार करणारी चामुंडी एक्स्पोलसिव्ह कंपनी आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता कंपनी सुरू झाल्यानंतर जवळपास १०० मजूर या कंपनीत कामाला गेले होते. या कंपनीत फटाक्याच्या वात बनविण्याच्या युनिटमध्ये जवळपास ९ मजूर काम करीत होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास कंपनीत अचानक स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज झाला. या स्फोटात होरपळून ९ कामगार गंभीर जखमी झाले. त्यामध्ये पाच महिलांसह ६ जणांचा घटनास्थळीच भाजून मृत्यू झाला. तीन जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिघापैकी दोन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अनेक गावकऱ्यांची नागपुरात धाव

शनिवारी जानसा म्हरसकोल्हे याचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. शनिवारी दुपारी श्रद्धा पाटील या कामगाराचा मृत्यूची बातमी धामणा गावात धडकली. त्यामुळे अनेक गावकऱ्यांनी नागपूरकडे धाव घेतली. गावातील अनेकांनी रुग्णालय परिसरात श्रद्धाच्या कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला.

गावकऱ्यांमध्ये उफाळला रोष

 दंदे रुग्णालयात अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरु असलेल्या श्रद्धा पाटीलचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. स्फोटातील आठवा मृत्यू झाल्यामुळए गावकऱ्यांमध्ये रोष उफाळला. अनेक गावकऱ्यांनी श्रद्धा हिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांना धीर दिला. काही गावकऱ्यांनी बैठक घेऊन या घटनेबाबत आपला रोष व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.