लोकसत्ता टीम

वर्धा: नागपुरात संविधान चौकात आंदोलन केले त्यावेळी उन्हामुळे कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडेल म्हणून समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी उपोषण सोडायला लावले. प्रश्न कायम असल्याने आता समता परिषद नव्या आंदोलनात उतरणार. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ शासकीय वसतिगृहे तसेच बाहेरगावी शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वर्षाकाठी ८० हजार रुपये देणारी ज्ञानज्योती योजना लागू करण्याची मागणी भुजबळ यांनी नागपूरच्या अधिवेशनात २७ डिसेंबर २०२२ रोजी केली होती.

loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
Appointment of Governor nominated MLAs Thackeray group challenges appointment of seven MLAs in High Court Mumbai news
राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण; सात आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचे उच्च न्यायालयात आव्हान
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”

त्यास उत्तर देताना दोनच दिवसांनी २९ डिसेंबरला फडणवीस यांनी याच वर्षापासून ज्ञानज्योती आधार योजना लागू करण्याची घोषणा सभागृहातच केली. पण ते वर्ष संपून दुसरेही सुरू झाले. मात्र वसतिगृह पण नाही व आधार पण लागू झाली नसल्याची बाब महज्योतीचे माजी संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.दिवाकर गमे यांनी निदर्शनास आणली.

हेही वाचा… येत्या दोन-तीन दिवसात मान्सून पुढे सरकणार

राज्य शासनाचा ओबीसी वर राग आहे का, असा सवाल करीत त्यांनी १४ जुलै पर्यंत मागणी अमलात न आल्यास १५ जुलै पासून फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदारांना साद घालणार असल्याचे जाहीर केले. प्रथम फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांना निवेदन देवून स्मरण करून दिल्या जाणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्व ओबीसी विद्यार्थी आपापल्या आमदारांच्या घरी जातील. त्यांच्या पायरीवर बसून शांततेत साद घालणार आहेत. २८८ मतदारसंघात हे आंदोलन शांततेत पार पाडावे, असे आवाहन संघटनेने केले आहे. या वर्षापासून वसतिगृहे सुरू झालीच पाहिजे, असा संघटनेचा आग्रह आहे.

Story img Loader