नागपूर : सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे पडसाद शनिवारी राज्यभर उमटले. मराठवाड्यातील आंदोलनाची झळ ‘एसटी’ला बसली. नागपूरहून एसटीने मराठवाड्याला निघालेले बरेच प्रवासी मध्येच अडकून पडले. मराठवाड्याहून नागपुरात एकही बस आली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठा आंदोलनामुळे शनिवारी नागपूर विभागातील एसटीचे तब्बल ३,४०१ किलोमिटर परिचलन रद्द झाले. एसटी महामंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूरहून छत्रपती संभाजीनगर, अंबेजोगाई, सोलापूर, पुणेपर्यंत काही बसेस धावतात. त्यापैकी मराठवाड्यात आंदोलन पेटल्याने तेथील पाचपैकी एकही बस नागपुरात परत आली नाही.

हेही वाचा >>>एसटीचे ४५ आगार पूर्णत: बंद; मराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ ‘या’ जिल्ह्याला…

नागपूरहून छत्रपती संभाजीनगर येथे निघालेली बस वाशीमला पोहचल्यावर रद्द झाली. अंबेजोगाईला निघालेली बस पुसदला रद्द झाली. छत्रपती संभाजीनगरला निघालेली एक बस कारंजा लाड येथे तर दुसरी बस चिखली येथे रद्द झाली. त्यामुळे नागपूरहून मराठवाड्याच्या दिशेला निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप झाला. तुर्तास नागपूर विभागातील आगारांतून मराठवाड्यातील फेऱ्या वगळता इतर भागातील परिचलनावर काहीही परिणाम झाला नाही, हे विशेष.