लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर: भारतातील अग्निवीरांची पहिली तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. सहा महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर महाराष्ट्रातील ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कामठी येथे आज शनिवारी पासिंग आऊट परेड पार पडली. जून २०२२ मध्ये तिन्ही दलासाठी अग्निपथ योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी हवाई दल आणि नौदलात अनिवीरांची पहिली तुकडी याआधीच दाखल झाली आहे. आज सैन्यदलात दाखल होण्यासाठी अग्निवीरांची पहिली तुकडी सज्ज झाली आहे.

यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ११५ अग्निवीरांची आज पासिंग आऊट परेड झाली. परेडचे निरीक्षण गार्ड्स रेजिमेंटल सेंटरचे प्रमुख ब्रिगेडियर के. आनंद यांनी केले. अग्निपथ भरती योजनेअंतर्गत या अग्निवीरांचे प्रशिक्षण जानेवारी २०२३ मध्ये ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कामठी येथे सुरू झाले होते.