चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना आणि त्यानंतरच्या आर्थिक अडचणी असतानाही राज्यात तीन वर्षांत सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात (एमएसएमई) महिलांचा टक्का किंचित का होईना वाढताना दिसत आहे. २०२०-२१ मध्ये या क्षेत्रात महिलांचा वाटा १९.१ टक्के होता.२०२१-२२ मध्ये १९.६३ टक्के झाला व २०२२-२३ मध्ये २१.९१ टक्क्यांवर गेला. एकूण नोंदणीतही महाराष्ट्र इतर राज्याच्या तुलनेत अग्रेसर आहे.

केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्याचा लाभ घेत महिलांनीही उद्योग सुरू केले. त्यातून रोजगार निर्मितीही झाली. करोना काळातील टाळेबंदीचा या क्षेत्राला जबर फटका बसला होता. अनेक स्टार्टअप्स बंद झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात मागील तीन वर्षांत एमएसएमई क्षेत्रात उद्योग नोंदणी व त्यात महिलांचा टक्का वाढत असल्याचे विभागाच्या यासंदर्भातील नोंदीतून दिसून येते.

एमएसएमई मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०२०२१ मध्ये देशभरात २८ लाख ५२ हजार ६४० सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांची नोंदणी झाली. त्यात महिलांचे प्रमाण ४ लाख ८९ हजार २९६ (१७.१५ टक्के) होते. याच वर्षांत महाराष्ट्रात ६ लाख ४९ हजार ३८३ नोंदणी झाली व त्यात महिलांचे प्रमाण १ लाख २३ हजार ४४८ (१९.०१ टक्के) होते. २०२१-२२ मध्ये देशात एकूण ५१ लाख ५४ हजार १४७ सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांची नोंदणी झाली. त्यापैकी ९ लाख १० हजार ८२१ (१७.६७ टक्के)महिलांच्या मालकीचे होते. याच वर्षांत महाराष्ट्रात ९ लाख ७६ हजार४११ एमएसएमईची नोंदणी झाली. त्यापैकी १ लाख९१ हजार ६७१ (१९.६३ टक्के) होते. त्याच प्रमाणे २०२२-२३ या वर्षांत देशात नोंदणी झालेल्या एकूण ५८ लाख ७८ हजार९९५ लघु व मध्यम उद्योगांपैकी ११ लाख ९७ हजार ३८१ (२०.३७) ची मालकी महिलांकडे होती. एकूण नोंदणीपैकी महाराष्ट्रातील उद्योगांची संख्या ९ लाख ९० हजार ५११ होती. त्यात महिलांचा वाटा २ लाख १६ हजार ९९९ (२१.९१ टक्के) होता.