नागपूर : ती आईसोबत झोपी गेली. मध्यरात्री पायाला काही तरी चालले म्हणून तिला जाग आली. वडिलांनी लाईट लावला तर सर्वांना धक्काच बसला. भला मोठा नाग तेथे होता. काय झाले असावे याची कल्पना सर्वाना आली. तोपर्यंत तिच्या अंगात विष पसरले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हिंगणा तालुक्यातील नेरी मानकर या गावात मयुरी रामोजी धुर्वे, (वय-२०) ही गुरूवारी तिच्या आईसोबत घरात जमिनीवर झोपली होती. रात्री १:३० वाजताच्या सुमारास तिच्या पायाला काहीतरी चावल्यासारखे वाटल्याने तिने तिच्या वडिलांना सदर बाब सांगितली. त्यांनी लाईट सुरु करून बघितले तेव्हा वडिलांना आलमारी खाली मोठा साप दिसला. काही वेळातच मयुरीच्या तोंडाला फेस आल्याने  वडिलांनी तिला वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र पहाटे ५ वाजता तिला मृत्यू झाला.