यवतमाळ: शहरासह राळेगाव तालुक्यातून दुचाकी चोरी करून त्या खड्डा करून त्यात लपवून ठेवणाऱ्या भामट्यास पोलिसांनी अटक केली. ही कारवाई राळेगाव पोलीस पथकाने केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतोष नामदेव वाघमारे रा. झाकीर हुसेन कॉलनी वर्धा याने २ नोव्हेंबर रोजी राळेगाव पोलीस ठाण्यात आपली दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती. ३१ ऑक्टोबर रोजी राळेगाव विश्रामगृह परिसरात दुचाकी उभी केली असता ती चोरट्याने चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणी राळेगाव ठाण्यात वाहन चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान लोहारा परिसरात चोरीस गेलेल्या वर्णनाप्रमाणे मोटारसायकल घेऊन एकजण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तत्काळ जाऊन त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा… चंद्रपूर शासकीय रुग्णालयात अस्वच्छतेचा कळस; जागोजागी कचऱ्याचे ढीग

सुमित निरंजन भगत (३०) रा. नांझा ता. कळंब ह.मु. पिवळी नदीजवळ नागपूर असे या भामट्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. पथकाने पोलीस खाक्या दाखविताच सुमित भगत याने राळेगाव व यवतमाळ परिसरातून आणखी चार दुचाकी चोरल्याची आणि त्या लोहारा परिसरातील जंगलात एका खड्ड्यामध्ये पुरल्याचे सांगितले. पोलिसांनी या चारही दुचाकी खड्ड्यातून ताब्यात घेतल्या. पोलिसांनी या कारवाईत तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या भामट्याकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, पोलीस अमलदार गोपाल वास्टर, सुरज चिव्हाणे, सुरज गावंडे, विशाल कोवे आदींनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The police arrested an accused who stole a two wheeler from yavatmal and ralegaon taluka and hid it in a pit nrp 78 dvr