लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वाशीम: कारंजा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या कामरगाव येथील हिरुळकर ज्वेलर्स मध्ये ८ मे २०२३ रोजी चोरट्यांनी शटर ताडून ७ लाख १५ हजार रूपये लंपास केल्याची घटना घडली होती. मात्र, अद्यापही चोरट्यांचा पोलिसांना थांगपत्ता लागत नसल्याने ज्वेलर्सचे मालकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे न्यायाची मागणी केली असून चोरट्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
कामरगांव येथे हिरुळकर व दीक्षित ज्वेलर्स सोने-चांदीचे दुकान आहे. चोरट्यांनी शटर तोडून सोने चांदीचे लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना ८ मे रोजी घडली होती. याबाबत पोलीस चौकी कामरगाव येथे कळविले असता पोलिसांनी येऊन पंचनामा केला होता. तसेच धनज बु. पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती.
परंतु धनज बु. पोलिस गुन्ह्याचा छडा लावण्यात अपयशी ठरले. त्यामुळे ज्वेलर्सचे मालक निलेश हिरुळकर, चेतन दीक्षित यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन चोरट्यांना शोधण्याची मागणी केली. याबाबत धनज बु पोलीस स्टेशन चे इंगळे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.