नागपूर : मधुमेह झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका युवकाने घर सोडले आणि थेट तलाव गाठले. त्याने आत्महत्येचा विचार केला. मात्र, काही वेळातच आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या युवकासमोर पोलीस देवदुताप्रमाणे उभे झाले. त्यांनी त्या युवकाचे समूपदेशन केले आणि कुटुंबियांच्या ताब्यात दिले. उदय असे त्यांचे नाव आहे. उदय यांना पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. नियमित ते दुकान सांभाळतात. अलिकडेच त्यांना मधुमेहाचा आजार झाला. आता आपले पुढे काय होईल? या विचाराने त्यांच्या अंगावर शहारे यायचे. आता जगून उपयोग तरी काय? जगायचे तरी कशाला? अशा विचारांची गर्दी त्यांच्या डोक्यात व्हायला लागली. त्यांनी हे शब्द मुलांजवळही बोलून दाखविले.

मात्र, वडिल टोकाची भूमिका घेतली, असा विचारही मुलांनी केला नाही. विचारांची गर्दी वाढल्याने २ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ते घरून निघाले. सायंकाळी मात्र, मुलांना चिंता झाली. त्यांनी पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. पोलिसांनी ‘मिसिंग’ची तक्रार नोंदविली आणि तपास सुरू केला. पोलिस शिपाई प्रशांत दराडे आणि अक्षय सहारे यांनी मार्गातील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले.तपासाची दीशा मिळाली आणि पोलीस शेवटच्या टोकावर पोहोचले. उदय रामटेक जवळील एका तलावाजवळ बसून आत्महत्येच्या तयारीत होते. देवदूताप्रमाणे पोहोचलेल्या पोलिसांनी त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले. पोलिसांना उशिर झाला असता तर कदाचित आज उदय या जगात नसते.

thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
दवाखान्यातील चिठ्ठीमुळे कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटली, आठवड्याभरापूर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Kashmiri Girl Suicide
Kashmiri Girl Suicide : बॉयफ्रेंड नीट बोलत नाही म्हणून बँक ऑफ अमेरिकेतील काश्मिरी तरुणीची हैदराबादमध्ये आत्महत्या
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला

हेही वाचा>>>नागपूर: करोना प्रतिबंधात्मक लस कुणी घेईना! पूर्व विदर्भात १.१० लाख लस मात्रा मुदतबाह्य

चोवीस तासात घेतला शोध

उदय दुपारी १२ वाजता घरून निघाले. ऑटोरीक्षाने ते कामठी रेल्वे स्थानकावर गेले. कोलकाता मार्गे जाणाऱ्या गाडीत बसले. रामटेकला उतरले आणि परिसरातील एका तलावाजवळ गेले. त्यांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार सुरू होता. कदाचित त्यांनी आत्महत्या केली असती. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजने एक एक कळी जोडली आणि २४ तासात त्यांचा शोध घेतला.

हेही वाचा>>>नागपूर: करोना प्रतिबंधात्मक लस कुणी घेईना! पूर्व विदर्भात १.१० लाख लस मात्रा मुदतबाह्य

जीवनात वेळ कशीही असो ती नक्कीच बदलते

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. जीवनात वेळ कशीही असो ती नक्कीच बदलते. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की अपोआप सुटतात. अशा शब्दात वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय मालचे यांनी समूपदेशन केले.