नागपूर : मधुमेह झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका युवकाने घर सोडले आणि थेट तलाव गाठले. त्याने आत्महत्येचा विचार केला. मात्र, काही वेळातच आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या युवकासमोर पोलीस देवदुताप्रमाणे उभे झाले. त्यांनी त्या युवकाचे समूपदेशन केले आणि कुटुंबियांच्या ताब्यात दिले. उदय असे त्यांचे नाव आहे. उदय यांना पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. नियमित ते दुकान सांभाळतात. अलिकडेच त्यांना मधुमेहाचा आजार झाला. आता आपले पुढे काय होईल? या विचाराने त्यांच्या अंगावर शहारे यायचे. आता जगून उपयोग तरी काय? जगायचे तरी कशाला? अशा विचारांची गर्दी त्यांच्या डोक्यात व्हायला लागली. त्यांनी हे शब्द मुलांजवळही बोलून दाखविले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in