नागपूर : ऐरवी मंदिर म्हंटले की भक्तांची वर्दळ आलीच. पण बुधवार हा दिवस तीर्थक्षेत्र कोराडीतील महालक्ष्मी मंदिरासाठी वेगळा होता. तेथे येणारे भक्त सामान्य नव्हते. तर त्या होत्या देशाच्या महामहीम राष्ट्रपती.गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समांभाला उपस्थित राहिल्या. दुपारी ४.४० च्या सुमारास कोराडी मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्या. महालक्ष्मी जगदंबा मंदिर पुरातन असून भोसलेकालीन साम्राज्यात या मंदिराचे मूळ बांधकाम करण्यात आले. राज्य शासनाने या मंदिराला तीर्थ व पर्यटन क्षेत्र ‘ब’ श्रेणीचा दर्जा दिला आहे.
राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोराडी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे याप्रसंगी उपस्थित होते मंदिर समितीतर्फे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रपतींना देवीच्या प्रतिकृतीची भेट दिली.