बुलढाणा : मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील एका मुख्याध्यापकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज, २७ मार्चला  ही बाब उघडकीस आली. रत्नाकर शिवाजी गवारे (५५) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. आज पावणेअकराला शाळा सुटल्यानंतर मुख्याध्यापक गवारे त्यांच्या कार्यालयातच बसून होते. शिपायाने येऊन पाहिले असता गवारे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. जानेफळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. गवारे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.