वर्धा : खासगी संस्थेची मालकी विविध कारणांनी बदलत असते. आता तर आर्थिक दृष्ट्या परवडत नसेल तर शैक्षणिक संस्था इतरास मालमत्तेसह विकायला जाण्याचे प्रकार सरसकट होत आहे.असेच हे प्रकरण.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथील ओम स्कूल ऑफ एक्सेलेन्स हे महाविद्यालय गजानन पीसुळकर यांच्या मालकीचे आहे. ते त्यांनी अमोल श्रीवास्तव यांना विकण्याचा सौदा केला. मात्र पूर्ण विक्री झालेली नाही. मात्र तरीही श्रीवास्तव याने २५ खोल्यांवर ताबा घेतला. सुरू असलेल्या या महाविद्यालयातील प्रयोगशाळा प्राचार्यांच्या ताब्यात आहेत. प्राचार्य संजय वानखेडे हे त्यांच्या कक्षात बसून असताना कर्मचारी प्रेरणा गेडाम व प्रीती गाठले या धावत त्यांच्याकडे पोहोचल्या.

हेही वाचा – चंद्रपूर : निराधार, वृद्ध कलावंत मानधन योजनेतील उत्पन्न प्रमाणपत्राची अट शिथिल

श्रीवास्तव व त्याचे मजूर लॅबचे कुलूप तोडत असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा प्राचार्य वानखेडे यांनी धाव घेत तोडकाम थांबविण्याची विनंती केली. मुलांचे प्रॅक्टिकल सुरू असून सत्र संपेपर्यंत तुम्ही ताबा घेवू नका असेही सुचविले. मात्र संतप्त श्रीवास्तव याने मजुराच्या हातातील रॉड घेत तो वानखेडे यांच्या डोक्यावर हाणला. ते जखमी झाले असून या प्रकरणी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The principal of om school of excellence was beaten up in wardha pmd 64 ssb