अकोला: हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पॅरोलवर सुटला होता. त्यानंतर तीन वर्षांपासून फरार असलेल्या कैदीला अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी परराज्यातून अटक केली. पूर्वाश्रमीचा पोलीस असल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये याची पूरेपूर काळजी घेत होता. अखेर शिताफीने पोलिसांनी त्याला पकडलेच.
हिंगणा शिवारात ०३ नोव्हेंबर २०१५ रोजी रणजीतसिंग चुंगडे व जसवंतसिंग चौहान यांनी किशोर खत्री यांची हत्या केली होती. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. हत्याकांड प्रकरणी आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने २७ सप्टेंबर २०१८ रोजी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा भोगत असताना २०२० मध्ये कैदी जसवंतसिंग चौव्हान हा पॅरोल रजेवर जिल्हा कारागृहातून सुटला होता. तो कारागृहात परत गेला नाही. २९ जुलैपासून २०२० पासून तो फरार होता. त्याच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना फरार कैदी जसवंतसिंग चौहान याचा विशेष पथक स्थापन करून शोध घेणे व त्यासाठी काय प्रयत्न केले, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पोलीस अधीक्षक संदीप घुगेंनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना फरार कैदीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या.
हेही वाचा… पाणीपुरवठा योजनांसाठी सहा प्रकल्पातील पाणी आरक्षित, औद्योगिक वसाहतीला…
गोपनीय पद्धतीने फरार कैद्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून पाठपुरावा सुरू होता. फरार कैदी जसवंतसिंग हा पूर्वी पोलीस खात्यात नोकरीवर असल्याने त्याला कायदा व तपासाची पूर्ण माहिती होती. त्यामुळे फरार राहण्याची योग्य ती दक्षता तो घेत होता. त्याला पकडणे हे पोलिसांसमोर एक आव्हान होते.
१९ ऑक्टोबरला फरार कैदी जसवंतसिंग हा मध्यप्रदेश येथील बुऱ्हानपूर येथे असल्याची माहिती मिळाली. एक विशेष पथक त्याला पकडण्यासाठी रवाना केले. सापळा रचून बुऱ्हानपूरमधून फरार कैदी जसवंतसिंग चौहान याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी आरोपीला जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स.पो.नि. कैलास भगत व त्यांच्या पथकाने केली.