शहरातील विविध भागात पाळीव श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना ज्यांच्याकडे दोनपेक्षा अधिक पाळीव श्वान आहेत, अशा श्वान मालकांवर कारवाई करण्याचे धोरण जाहीर करण्यात आले होते मात्र हे धोरण गेल्या काही दिवसांपासून थंडबस्त्यात असून त्यावर कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही.

हेही वाचा >>>नागपूर : ‘भारत जोडो’ यात्रेकरिता महिला काँग्रेसची बाईक रॅली

शहरात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाळीव श्वानांची संख्या वाढली असताना दोनपेक्षा अधिक श्वान पाळण्याबाबत महापालिकेने धोरण ठरवले होते. ज्यांच्याकडे दोनपेक्षा अधिक श्वान याबाबत शहरात सर्वेक्षण करण्यात आले होते आणि ३५ प्रकरणे समोर आली होती. एका घरात दोनपेक्षा अधिक श्वान पाळता येणार नसल्याचे त्यावेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते आणि तसे आदेश काढण्यात आले होते. मात्र त्यावेळी प्राणीमित्र संघटनेच्या विरोधानंतर सर्वेक्षण बंद करण्यात आले. शहरात सध्या गेल्या काही दिवसात भटक्या कुत्र्यांच्या संख्यात वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे. अनेक लोकांकडे दोनपेक्षा अधिक श्वान असताना त्यांचा त्रास विविध वस्त्यामध्ये वाढला होता आणि नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या.

हेही वाचा >>>जाचक अटींमुळे शेतकरी त्रस्त ; शासकीय योजनेचे लाभार्थी अतिवृष्टीबाधितांच्या मदतीस अपात्र

कुठेही शौच करण्यामुळे नागपूरकर हैराण
ज्यावेळी या श्वानांचे वय वाढते किंवा त्यांचा इतर कोणताही आजार जडल्यास त्यांनाही भटक्या श्वानांप्रमाणे सोडले जाते. एवढेच नव्हेतर, अनेक ठिकाणी भटके श्वान अपघाताला कारणीभूत देखील ठरतात. याशिवाय, घरगुती पाळीव श्वानांना त्यांचे मालक रस्त्यावर घेऊन फिरतात, त्यामुळे त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने किंवा कुठेही शौच करण्यामुळे नागपूरकर हैराण झाले आहेत. अशाप्रकारच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका एका घरी दोनपेक्षा अधिक श्वान नको असे नवे धोरण आणले मात्र या धोरणावर अद्यापही कार्यवाही नसून ते थंडबस्त्यात पडले आहे.

हेही वाचा >>>पर्यटकांसाठी चित्तादर्शन अद्याप दूरच ; ‘टास्क फोर्स’च्या बैठकांवर बैठका; जंगलात सोडण्याबाबत मात्र निश्चिती नाही

वीस हजारांपैकी केवळ ९८ श्वानांचे परवाने
शहरात अंदाजे वीस हजार पाळीव कुत्रे आहेत, परंतु चालू आर्थिक वर्षात केवळ ९८ कुत्र्यांच्या मालकांनीच महापालिकेकडून पाळीव प्राणी घरात ठेवण्याचा परवाना घेतला आहे. महापालिकेनुसार, पाळीव प्राणी घरी ठेवण्यासाठी मालकांना दरवर्षी परवाना घेणे बंधनकारक आहे, परंतु, फारच कमी लोक नियमाचे पालन करतात. पाळीव प्राण्यांची जास्त गर्दी, पाळीव प्राण्यांचा गैरवापर आणि मालक आणि त्यांचे शेजारी यांच्यातील संघर्षाच्या अनेक तक्रारी उद्भवल्यानंतर काही वर्षांपूर्वी नियम अनिवार्य करण्यात आले होते. महापालिकेकडून परवाना घेण्यासाठी पाळीव प्राणी मालकांकडून मिळणारा प्रतिसाद मिळाला नाही. महापालिकेकडे त्यांच्या पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्यात अयशस्वी ठरलेल्या मालकांना दंड करण्यासाठी महापालिका एक अभियान सुरू करणार आहे.

हेही वाचा >>>सरकारकडून उमेदवारांची फसवणूक! ; जिल्हा परिषद भरती रद्द केल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आंदोलनाचा इशारा

ज्यांच्या घरी दोनपेक्षा अधिक श्वान आहेत अशा श्वान मालकांवर कारवाई करण्याबाबत धोरण तयार करण्यात आले होते. त्या धोरणाची दहाही झोनमध्ये अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र, त्या धोरणाचे काय झाले याची माहिती घ्यावी लागेल. – डॉ. गजेंद्र महल्ले, आरोग्य अधिकारी, महापालिका

Story img Loader