नागपूर: कृत्रिम बुब्बुळ बनविण्याची प्रक्रिया संशोधनाच्या टप्यात आहे. काही मेट्रो शहरातील रुग्णालयांत या कृत्रिम बुब्बुळाचे प्रत्यारोपण सुरू झाले. परंतु प्राथमिक स्तरात त्याच्या यशस्वीतेचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती नागपुरातील मेडिकल रुग्णालयाचे ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अशोक मदान यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या नैसर्गिक म्हणजे नेत्रदानातून मिळालेल्या प्रत्यक्ष मानवी बुब्बुळाच्या तुलनेत कृत्रिम बुब्बुळ प्रत्यारोपणाचा यशाचा दर कमी आहे. विविध नेत्राशी संबंधित संस्था व संघटनांच्या निरीक्षणानुसार नैसर्गिक बुब्बुळ प्रत्यारोपणाच्या यशस्वीतेचा दर ७५ टक्के आहे. कृत्रिम बुब्बुळ प्रत्यारोपणाच्या यशाचा दर २५ टक्के असल्याचेही प्राथमिकदृष्ट्या नोंदवण्यात आल्याचेही डॉ. मदान यांनी सांगितले. परंतु हळूहळू या संशोधनाला यश मिळून उत्तम कृत्रिम बुब्बुळ मिळून या प्रत्यारोपणाचे यश वाढण्याची आशाही डॉ. मदान यांनी वर्तवली.