उपराजधानीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मृती शैक्षणिक कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव अजूनही प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे अजुनही कागदावर आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार असताना गेल्या सहा महिन्यापासून या प्रकल्पाला गती मिळाली नाही.
हेही वाचा- राज्यातील ५२० हवालदार होणार पोलीस उपनिरीक्षक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त जुनी शुक्रवारी भागातील बंद असलेल्या चिटणवीसपुरा प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या जागेवर बाळासाहेब ठाकरे स्मृती शैक्षणिक कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्र निर्माण करण्याचा प्रस्ताव आला असताना त्यासाठी निविदा काढण्यात आली होती. तसेच निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. सध्या राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. मात्र, गेल्या सहा सात महिन्यांपासून या प्रकल्पाला अजूनही सुरुवात झाली नाही. या प्रकल्पासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जात होती. गेल्या पाच वर्षात महापालिकेत शिवसेनेचे केवळ दोन सदस्य होते त्यामुळे त्यांनी याबाबत कधीच पाठपुरावा केला नाही. या केंद्रामध्ये वाचनालय, सभागृह, बाळासाहेबांच्या कार्याची ओळख करून देणारे म्युझियम, गेस्ट रुम आदी सोयी सुविधा करण्यात येणार आहे.
हेही वाचा- जगाला औषध पुरवणारे केंद्र होण्याची भारतामध्ये क्षमता; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास
२०१८-१९च्या अर्थसंकल्पात १.५० कोटी रुपये तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर २०२० -२०२१ मध्ये २ कोटींची तरतुद करण्यात आली होती. शाळा पाडण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी काम सुरू करण्यात येणार होते. मात्र, प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगत गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकल्प केवळ कागदावर असल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पासाठी सरवटे मे. कलेक्टिव अरबा निजम यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती हे विशेष.
हेही वाचा- “…तर काँग्रेस केवळ निवडणूक पोस्टरवरच उरेल”, सुनील केदारांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना इशाराहेही वाचा-
जुनी शुक्रवारीतील बंद पडलेली शाळेची इमारत पाडण्यात आल्यानंतर काम सुरू केले जाणार होते. त्यासाठी निविदा काढण्यात आली. शाळेला दोन खोल्या देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे हा प्रकल्प रेंगाळला आहे, अशी माहिती भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिली.