वर्धा : विविध घोटाळे केल्याचा ठपका ठेवत येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता काढून घेण्यात आली आहे. राज्याचा समाजकल्याण आयुक्तांनी हा आदेश काढला आहे.विधिमंडळ अधिवेशनात आमदार दादाराव केचे यांनी महाविद्यालयाच्या गैरव्यवहारप्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता.त्यावर चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले होते. समितीस गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढलुन आल्या.लघुलेखक व वसतिगृह सफाईगार या पदांची भरती करतांना नियमानुसार कार्यवाही झालेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौकशीनुसार या पदांची सेवा समाप्त करण्यात यावी.तसेच वेतनापोटी देण्यात आलेले अनुदान संस्थेकडून वसूल करण्यात यावे. सदर महाविद्यालय संचालित करणारी संस्था अनिकेत शिक्षण संस्था भंडारा यावर प्रशासक बसविण्याची शिफारस समितीने केली.गुणवाढ प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या प्राध्यापकला संस्थेने सेवेत कायमच ठेवले, असाही ठपका होता.त्या अनुषंगाने अनिकेतची मान्यता काढण्याचा निर्णय झाला. यास दुजोरा देताना सहाय्यक समाज कल्याण आयुक्त प्रसाद कुलकर्णी म्हणाले की मान्यता काढण्यात आल्याने या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश इतरत्र वर्ग करण्याचे ठरले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The recognition of aniket college of social work was withdrawn on the charge of scams wardha pmd 64 amy
Show comments