नागपूर : राज्यातील वीस लाख उमेदवार अर्जापोटी पाच ते सहा हजार रुपये भरून चार वर्षांपासून चातकासारखी वाट पाहत असतानाच राज्य शासनाने जिल्हा परिषदांतील १३ हजार ५१४ रिक्त पदांची संपूर्ण भरतीचा सुधारित आकृतीबंधच तयार नसल्याने या जागा १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत कशा भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्य शासकीय सेवेतील ७५ हजार रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. यात जिल्हा परिषदेतील रिक्त जागांचाही समावेश आहे. मात्र, भरती कधी होणार हा मोठा प्रश्न असला तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०२३ मध्ये पदभरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

हेही वाचा >>> हवामान बदलाचे चक्र काही संपेना, मान्सूनच्या मोसमात उष्णतेची लाट

आधी परीक्षा कशी घ्यायची, यामुळे ही पदभरती रखडली. त्यानंतर, ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर या कंपन्यांबरोबर करार कसे करायचे यात वेळ गेला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषदांमधील रिक्त जागा भरण्याचा निर्णय चार वर्षापूर्वीच झाला असताना रिक्त पदांचा सुधारित आकृतीबंधही तयार नसल्याची बाब धक्कादायक आहे. सुधारित आकृतीबंध सादर करण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार आहे? अशी विचारणाही केली होती.