चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ३६० पदांची नोकरभरती टीसीएस व आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून करावी, अशी मागणी करीत रवींद्र शिंदे यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिंदे यांनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांच्याकडे राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वीही दोन वेळा राजीनामा नाट्यप्रयोग केला आहे. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष रावत व संचालक मंडळ त्यांचा राजीनामा मंजूर करते का? याकडे सहकार वर्तुळाचे लक्ष लागले होते.

हेही वाचा – मराठा आरक्षण क्रांती मोर्चा : बुलढाणा जिल्हा, आयोजकांसह इतर भागांतही उत्सुकता!

हेही वाचा – हे जातचोर आता फिरताहेत, खोटे आरोप करताहेत…; आमदार यशोमती ठाकूर यांची राणा दाम्‍पत्‍यावर टीका

बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अन्य विषयांसह संचालक शिंदे यांच्या राजीनाम्याचा विषय ठेवण्यात आला होता. या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर शेवटी शिंदे यांचा संचालकपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे बँकेत येत्या काळात आणखी काही घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.