अकोला : शहरातील केशव नगर येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून दरोडेखोरांच्या टोळीने १६ लाख ५४ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरातील केशव नगर येथील रिंग रोडवर भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. या एटीएम केंद्रामध्ये कालच बँकेचे अधिकारी व खासगी एजन्सीमार्फत १६ लाखांची रोख रक्कम भरण्यात आली होती.

हेही वाचा >>> शिंदे-कवाडे युतीचा राजकीय लाभ कोणाला?

हेही वाचा >>> “हाऊ इज द जोश…!” पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका दिवसात उभारले पोलीस मदत केंद्र

दरोडेखोरांनी या एटीएम केंद्राला गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास लक्ष्य केले. तोंडाला फडके बांधून चारचाकी वाहनाने आलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी काही मिनिटांमध्ये एसबीआयचे एटीएम मशीन फोडले. त्यातील १६ लाख ५४ हजार रुपयांची रक्कम त्यांनी लंपास केली. खदान पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आदींना पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Story img Loader