अकोला : नियमित अहमदाबाद, भुसावळ, अकोला, वर्धा, वारंगल, विजयवाडा मार्गे धावणाऱ्या ओखा – पुरी व गांधीधाम – विशाखपट्टणम एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

१३ डिसेंबर रोजी ओखा येथून सुटणारी २०८२० ओखा – पुरी द्वारका सुपरफास्ट एक्सप्रेस वर्धा, नागपूर, रायपूर, टिटलागड, रायगडा आणि विजयनगरम मार्गे वळवण्यात आली आहे. १० व १७ डिसेंबर रोजी पुरी येथून सुटणारी २०८१९ पुरी – ओखा द्वारका एक्सप्रेस सुपरफास्ट एक्सप्रेस विजयनगरम, रायगडा, टिटलागड, रायपूर, नागपूर आणि वर्धा मार्गे वळवण्यात आली आहे. या दोन्ही रेल्वेचे नियमित मार्गावरील विशाखापट्टणम, अनकापल्ले, समलकोट, राजमुंद्री, एलुरु, विजयवाडा, वारंगल, रामागुंडम, मंचिरयाल, सिरपूर कागजनगर, बल्हारशाह आणि चंद्रपूर रेल्वेस्थानकावर थांबे वगळण्यात आले आहेत.

local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

हेही वाचा – सरसकट सर्वच उत्तीर्ण ही संकल्पना आता बाद, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

१४ डिसेंबर रोजी विशाखपट्टणम येथून सुटणारी २०८०३ विशाखपट्टणम – गांधीधाम सुपरफास्ट एक्सप्रेस विजयनगरम, रायगडा, टिटलागड, रायपूर, नागपूर आणि अकोलामार्गे वळवण्यात आली आहे.

हेही वाचा – गोंडवाना विद्यापीठात ‘पेट पास’ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळेना!

१० व १७ डिसेंबर रोजी गांधीधाम येथून सुटणारी २०८०४ गांधीधाम – विशाखपट्टणम सुपरफास्ट एक्सप्रेस अकोला, नागपूर, रायपूर, टिटलागड, रायगडा आणि विजयनगरम जंक्शन मार्गे वळवण्यात आली आहे. या दोन्ही रेल्वेचे नियमित मार्गावरील वर्धा, चंद्रपूर, बल्हारशाह, सिरपूर कागजनगर, रामागुंडम, वारंगल, खम्मम, विजयवाडा जंक्शन, एलुरु, राजमुंद्री, समलकोट आणि दुव्वाडा थांबे वगळण्यात आले आहेत. अप – डाउन मार्गावर ओखा – पुरी द्वारका एक्सप्रेसला वर्धा जंक्शनवर थांबा आहे, तर गांधीधाम – विशाखपट्टणम एक्सप्रेसला वर्धा जंक्शन थांबा नाही.